Posts

Showing posts from 2017

पत्रकार दिन दि. 6 जानेवारीनिमित्त विशेष लेखः- महान्यूजसाठी प्रबोध चंद्रिका: पत्रकारितेची शतकोत्तर रौप्य महोत्सवी वाटचाल

सन १८८०. ठिकाणः जळगाव  उत्तर महाराष्ट्रातील एक लहानसे गाव. या लहानशा आणि त्याकाळी साधनांची अजिबात उपलब्धता नसतांना नारायण नरसिंह अर्थात नानासाहेब फडणीस या अवघ्या १९ वर्षे वयाच्या युवकाने मोठ्या धाडसाने साप्ताहिक प्रबोध चंद्रीका चे प्रकाशन सुरु केले. त्या घटनेला महाराष्ट्राच्या पत्रकारितेत असलेले महत्व असे की लोकमान्य टिळकांच्या केसरी नंतर महाराष्ट्रात सुरु होणारे ते दुसरे वृत्तपत्र होते. त्यावेळच्या पारतंत्र्यात असलेल्या निरक्षर, अप्रगत समाजाचे प्रबोधन करण्याचा हा वसा ‘प्रबोध चंद्रीका’ ने  जोपासला. आजही ‘प्रबोध चंद्रीका’अव्याहतपणे गेली १३६ वर्षे प्रकाशित होते आहे, महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील ही एक दुर्मिळ व अलौकीक अशी घटना आहे. नानासाहेब फडणीसांनी श्रीमत जगद्गुरू शिळाप्रेस हा छापखाना काढून ‘प्रबोधचंद्रिका’ ची छपाई  जळगावच्या जुन्या जळगावात, मारुती पेठेत सुरु केली. या यंत्रावर २० इंच बाय १४ इंच कागद कागद छापला जाई. यंत्राची रचना सिलेंडरच्या आकाराप्रमाणे होती.त्याच्या दोन्ही बाजूस दोन चाके असत. चाके फिरवण्यास दोन माणसे लागत हि चाके फिरवली गेल्यावर शिळेचा पाटा पुढे मागे ...