पत्रकार दिन दि. 6 जानेवारीनिमित्त विशेष लेखः- महान्यूजसाठी प्रबोध चंद्रिका: पत्रकारितेची शतकोत्तर रौप्य महोत्सवी वाटचाल
सन १८८०. ठिकाणः जळगाव उत्तर महाराष्ट्रातील एक लहानसे गाव. या लहानशा आणि त्याकाळी साधनांची अजिबात उपलब्धता नसतांना नारायण नरसिंह अर्थात नानासाहेब फडणीस या अवघ्या १९ वर्षे वयाच्या युवकाने मोठ्या धाडसाने साप्ताहिक प्रबोध चंद्रीका चे प्रकाशन सुरु केले. त्या घटनेला महाराष्ट्राच्या पत्रकारितेत असलेले महत्व असे की लोकमान्य टिळकांच्या केसरी नंतर महाराष्ट्रात सुरु होणारे ते दुसरे वृत्तपत्र होते. त्यावेळच्या पारतंत्र्यात असलेल्या निरक्षर, अप्रगत समाजाचे प्रबोधन करण्याचा हा वसा ‘प्रबोध चंद्रीका’ ने जोपासला. आजही ‘प्रबोध चंद्रीका’अव्याहतपणे गेली १३६ वर्षे प्रकाशित होते आहे, महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील ही एक दुर्मिळ व अलौकीक अशी घटना आहे.
नानासाहेब फडणीसांनी श्रीमत जगद्गुरू शिळाप्रेस हा छापखाना काढून ‘प्रबोधचंद्रिका’ ची छपाई जळगावच्या जुन्या जळगावात, मारुती पेठेत सुरु केली. या यंत्रावर २० इंच बाय १४ इंच कागद कागद छापला जाई. यंत्राची रचना सिलेंडरच्या आकाराप्रमाणे होती.त्याच्या दोन्ही बाजूस दोन चाके असत. चाके फिरवण्यास दोन माणसे लागत हि चाके फिरवली गेल्यावर शिळेचा पाटा पुढे मागे करता येत असे. त्या दगडी शिळेवर हाताने लिहून,छपाईची शाई रुळाने शिळेवर लावावी लागे व त्याच्या मदतीने कागदावर छपाई केली जातअसे. त्याकाळी जळगावातल्या लोकांसाठी हा छापखाना आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. खान्देश कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतही हा छापखाना आपल्याला दिसतो.
ममई बाजारवाटे , चाले धडाड दनाना
असा जयगाव मधी , नानाजीना छापखाना
नानाजीना छापखाना , त्यांत मोठे मोठे पुठ्ठे
तसे शाईचे दराम, आत कागदाचे गठ्ठे
किती शिशाच्या चमट्या, ठसे काढले त्यावर
कसे निंघती कागद छापीसनी भराभर
चाले ‘छाप्याचे यंतर’ जीव आठे बी रमतो
टाकीसनी रे मंतर जसा भगत घुमतो
मानसा परी मानूस राहतो रे येडजाना
अरे होतो छापीसनी, कोरा कागद शहाना.
नानासाहेब फडणीसांनी १९२६ साली ‘प्रबोध चंद्रिके’ची धुरा त्यांचे चिरंजीव वासुदेव फडणीस यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी ट्रेडल, लेटर प्रेस या छपाई यंत्रांचा वापर करुन १९६० पर्यंत प्रबोधनाचा वारसा समर्थपणे चालवला. त्यानंतर त्यांचे नातू श्रीनिवास फडणीस यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत ही समाजप्रबोधनाची धुरा सांभाळली आणि छपाईचे अद्यावत तंत्र म्हणजे ऑफसेट छपाईचा अवलंबही केला. आता सध्या फडणीस कुटूंबाच्या चवथ्या पिढीतील कमलाकर फडणीस हे हा पत्रकारितेचा वसा सांभाळत आहेत.
त्या काळात साप्तहिक चालवण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसताना देखील नानासाहेबांनी मोठया अडचणीना तोंड देत साप्तहिक लोकप्रिय केलं.. जनजागृती बरोबरच सांस्कृतिक व सामाजिक चळवळीनचा प्रचार प्रसार केला त्याचबरोबर रेल्वे, पोलीस, पोस्टऑफीस, शाळा खाते यातील अन्याय लोकांच्या तक्रारी तसेच सार्वजनिक विहिरी, देऊळे, धर्मशाळा, या बाबत लोकांच्या मागण्या या सर्व गोष्टींना वाचा फोडून त्या सरकार च्या कानावर प्रबोदचंद्रिकेने पोहचून दिल्या.लोक गरजा व सामाजिक विकास या जाणीवेतून १९०१ मध्ये जळगाव चा विकास व्हावा या उदेश्याने तत्कालीन जळगाव म्युन्सिपलने कारभार कसा करावा, कोणत्या योजना कराव्यात सरकारला जागे करण्यासाठी अग्रलेखांच्या माध्यमातून जनतेचा प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले, त्यात जळगाव येथे मोफत सरकारी दवाखाना स्थापन करावा, सरकारी हायस्कूल उघडावे, जिल्यात सर्वत्र ग्रामपंचायती स्थापन कराव्यात , सरकारने ग्रामोद्योगाना सहाय्य करावे , स्वदेशी मालाचा प्रसार व्हावा ,सर्वत्र बहिष्काराची चळवळ उभी राहवी यावर मार्गदर्शन करणारे अनेक अग्रलेख लिहिले.
प्रबोधचंद्रीका साप्ताहिकाच्या प्रदीर्घ अशा माहितीवर आतापर्यंत पत्रकार, प्राध्यापक अशा सुमारे १५ जणांनी डॉक्टरेट अर्थात विद्यावाचस्पती हि पदवी संपादन केली आहे. शेकडो लेखक, पत्रकार यांना ह्या ज्ञानाचा उपयोगआपल्या जीवनात संदर्भ म्हणून केला आहे. फडणीस परिवार आजही विनामुल्य तेवढ्याच आपुलकीने ह्या संदर्भाचा ठेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते.
फडणीस परिवाराने प्रबोधचंद्रीकेचे अंक जपण्याचा प्रयत्न केला आहे.गेल्या कित्येक वर्षांचे जुने अंक आजही तेवढ्याच आपुलकीने संग्रही करून ठेवले आहेत. मात्र काळानुरूप जुन्या कागदांची हाताळणी करणे तसे अवघड हातात जुने अंक घेतल्यास कागदाचे तुकडे गळून पडतात. ते जतन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू आहेत या अंकांची एकत्रित डीजीटल स्वरूपात माहिती मिळावी म्हणून वेबसाईट तयार करण्याचे काम सुरु आहे. या साठी जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांच्या सहकार्याने काही अंकांचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जपणे म्हणजेच पत्रकारितेचा जिवंत इतिहास जपण्यासारखे आहे.
- वसंत कुलकर्णी
- लेखक आंतरवासिता विद्यार्थी आहेत.
(महाराष्ट्र शासनाचा महान्यूज वेब पोर्टल वरून साभार )

आता याच कार्यालय कुठे आहे
ReplyDelete