लोकमत सवे सर्वेक्षण नवमतदारांचा कौल
आज इंटरनेटच्या शोधामुळे माहितीच्या देवाणघेवाणीस गतिमानता येऊन प्रत्येक व्यक्ती माहितीचा जलद असा वाहक झाला आहे. आणि आताचा काळ तर सोशल मीडियाचा काळ आहे. अगदी ‘सोशल मीडियाचे युग’ असे म्हटले तरी काही वावगे होणार नाही. अलीकडच्या काळात सर्वाधिक तरुणांची संख्या आपल्या देशात आहे. पूर्वी तरुणाईला माध्यम म्हणून व्यक्त होण्यासाठी पर्याय उपलब्ध नव्हता. आज मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सक्षम पर्याय तरुणाईसाठी उपलब्ध आहेत. आजची तरुण पिढी बहुआयामी विचार करणारी आहे. प्रत्येक तरुण आपला स्वतंत्र विचार व्यक्त करण्यासाठी उत्सुक आहे. जगभरात घडणाºया प्रत्येक घटनेकडे आजची तरुणाई लक्ष ठेऊन असते व व्यक्त होते. इंटरनेटमुळे जग हे 'वैश्विक खेडे' बनले आहे. माहितीचे महाद्वारच आज समाजासाठी ‘इंटरनेट’ने खुले झाले आहे. नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात आजची नवमतदार पिढी काय विचार करते हे जाणून घेण्यासाठी प्रश्नावली घेऊन आम्ही जेव्हा तरुणांपर्यंत पोहोचलो, तेव्हा त्यांच्या मनातल्या अनेक बाबी प्रश्नावलीतील प्रश्नांच्या उत्तरांच्या माध्यमातून व्यक्त झाल्या. आजच्या तरुणांचा र...