लोकसभा निवडणूक २०१९ नवमतदारांशी साधलेला संवाद शब्दांकन -1
लोकसभा निवडणूक २०१९ नवमतदारांशी साधलेला संवाद शब्दांकन -1
निवडणुका जवळ आल्या की देशात ल वातावरण एकदम बदलायला लागत वैचारिक चर्चा रंगायला लागतात एक प्रकारे जनतेला आणि नागरिकांना महत्व प्राप्त होते.आज ची एकूणच राजकीय व्यवस्थे चा जेव्हा मी विचार करते त्या वेळेस या व्यवस्थे वर माझा विश्वास आहे की नाही? तेव्हा संभ्रम निर्माण होतो.नक्की काय ऊत्तर द्यावं यात गोंधळ निर्माण होतो कारण पटेल तेव्हा राजकीय पक्ष युती आणि लगेच काडीमोड घेतांना दिसतात एक मेकांवर टिका करणारे पक्ष व नेता राजकीय स्वार्थासाठी कधी संधान बांधतील ते सांगता येत नाही राजकीय पक्षांची एक मेकां सोबत असलेली धरसोड वृत्ती कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर ठेऊ नये यावर गोंधळ होतो.डाव्या उजव्या विचारसरणी बाबत सांगायचं म्हटलं तर लोकांच्या हितासाठी चांगल्या योजना व कल्पना अमलात आणेल त्या विचारसरणीचा विचार मानणे योग्य ठरेल.लोकशाहीत अर्थातच माझ्या म्हणजे नागरिकांच्या मताला किंमत आहे.लोकशाहीची व्याख्याच मुळात लोकांनी लोकांसाठी चालविले राज्य अशी आहे.लोकशाहीत जनता आपला लोकप्रतिनिधी निवडत असते,भारतीय राज्यघटनेत मतदानाच्या हक्काची तरतूद घटनाकारांनी करून ठेवली आहे.प्रत्येकाने मतदान करणे हेच मताचे महत्व अबाधीत ठेवणारे आहे.या मुळे लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीचा मताला किंमत नक्कीच आहे. लोकशाही शासन प्रणालीत लोकप्रतिनिधी निवड महत्वाची असते आणि या उमेदवारांना निवडून देताना जो उमेदवार जनतेच्या अडचणी व समस्या सोडवून जनतेचे हित साधण्यासाठी समर्थ असेल कार्यक्षम असेल त्या उमेदवारांना मत द्यावे.भ्रष्टाचारी लबाड उमेदवारांना निवडून देऊ नये मतदान करतांना पक्षा पेक्षा कार्यक्षम उमेदवाराला महत्व द्यावे.राजकीय नेत्या कडून मतदात्याना अपेक्षा असतात मूलभूत गरजा ज्या दुर्लक्षित राहिल्या आहेत त्या नुसार त्या त्या भागातील जनतेच्या मागण्या व अपेक्षा असतातआणि या माध्यमातून पायाभूत सुविधांचा देखील विकास होणे राजकीय नेत्यांकडून अपेक्षित आहेच. जाती धर्मचा प्रश्न हा जनतेच्या भावनांशी जोडलेला मुद्दा आहे. राजकीय नेते मंडळी नेमके याच भावनेशी खेळतांना दिसतात.ही स्वार्थीमनोवृत्ती भयंकर आहे.एक प्रकारे ज्वलंत प्रश्न बनला जातोय.राजकारण हे निकोप असावे.जाती धर्माच्या मुद्यावर जनतेला जास्त दिवस फसवणे बरोबर नाही.आणि येणाऱ्या काळात राजकारण्यांचे हे जाती धर्माचे राजकारण फोल ठरणार आहे.आज मतदारांच्या अपेक्षा व गरजा बदललेल्या आहेत.आज महितीची अनेक माध्यम खुली झाल्याने ही पिढी वैचारिक दृष्ट्या सक्षम झाली असून जाती धर्माची पट्टी गळून पडणार आहे.जाती धर्मा च राजकारण पुढच्या काळात यशस्वी होणार नाही हे मात्र निश्चित.आणि या वर्षी माझं मतदार यादीत नाव आहे आणि मी नक्कीच माझा मतदानाचा हक्क बजावणार आहे आणि इतरांनीही नक्कीच मतदान करावे जेणे करून येणाऱ्या काळात देशातील परिस्थिती सकारात्मक होईल.
Comments
Post a Comment