संकेत कोठावदे ( दहावी धुळे जिल्ह्यात दुसरा)
- मुलाखत शब्दांकन वसंत कुलकर्णी
( दहावीत धुळे जिल्ह्यात दुसरा 96.20 \ वीस पॉईंट ने पहिला नंबर हुकला )
आई, वडील, दोन्ही बहिणी, शिक्षक यांनी नेहमी सकारात्मक विचार देत,
कुठले हि दडपण न येवू देता स्वच्छेने अभ्यास करायला मोकळीक दिली़.
यामुळेच हे यश मिळवता आले.
1 प्रश्न: अभ्यास करण्याची प्रेरणा नेमकी कुणा पासून मिळाली तुला?*
उत्तर: अगदी सुरवातीपासून आपण बोर्डातच यावं असा काही अट्टाहास नव्हता मात्र स्वत:वर विश्वास होता.
आई-वडीलांनी ही कधी अभ्यासाचा तगादा लावला नाही. घरात आधीपासून अभ्यासाचं वातावरण होतं.
मोठी बहीण प्राजक्ताला दहावीच्या परीक्षेत ८९ टक्के मिळाले होते, तर लहान बहीण पूनमला देखील ९२ टक्के मिळाले होते़.
त्यामुळे त्यांच्यापासुन प्रेरणा घेऊन मला यश मिळविता आले़.
प्रश्न : अभ्यासासाठी वेळ व नियोजनाची पध्दत आत्मसाद केली?*
उत्तर : दहावीची परीक्षा आहे, खेळू नको, शालेय उपक्रमात भाग घेऊ नको अशी कोणतीही सक्ती मला आई-वडीलांनी केली नाही़.
दैनंदिनी छंद, खेळणे, शालेय उपक्रम सहभाग नोंदवून रोज ६ ते ७ तास अभ्यास करीत होता़.
नियमीत दहावीच्या परीक्षेत अभ्यास करतांना अनेकादा अडचणी येत होत्या़.
मात्र मोबाईलव्दारे इंटरनेटचा उपयोग करून यशाचे शिखर गाठता येवू शकले़.
*प्रश्न : कोणत्या क्षेत्रात करीयर करण्याची इच्छा आहे़ ?*
उत्तर : आधीपासुन मला विज्ञान विषयात आवड आहे़ आय.आय.एस.सी बँगलोर येथे आरटिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करियर करण्याची इच्छा आहे़ त्यामुळे भविष्यात मला संशोधन क्षेत्रात काम करायचे आहे. यापुर्वी ग्लोबल यंग सायंटिस्ट चेलेंज स्पर्धेत हेल्दी वॉटर हा प्रोजेकट सादर करून गोल्ड मेडल मिळवले होते़.
*प्रश्न: दहावीच्या परीक्षेत अभ्यास कसा अभ्यास केला़.*
उत्तर :दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यासाचे नियोजन अगदी नवव्या इयत्तेत निश्चित केले होते़ दररोज सहा ते सात तास अभ्यास करत नववीच्या वर्गात ९६ टक्के गुण मिळाले होते. यावर्षी दहावीत देखील तेवढेच गुण मिळवता आले़ क्लास न लावता मनाप्रमाणे अभ्यास केला.
*संकेतची मोठी बहीण भंडारा येथे बांधकाम विभागात सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहे़ तर लहान बहीण देखील बी.फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात महाविद्यालयात दुसरी आली आहे. दोन्ही बहिणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संकेत याने यशाचा मार्ग काढत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहूमान मिळविला.*
*आई-वडीलासंह बहिनीचा आर्दश*
दहावीची परीक्षा म्हटलं कि सर्वच विदयार्थी व पालकांवर दडपण येते कुठला क्लास चांगला याची शोधा शोध सुरु होते.
मुलांवर बंधने लादली जातात मात्र मुलांचा रिमोट कंट्रोल न करता स्वत:ची आवड जोपासायला मोकळीक द्यायला हवी.
मला माझ्या पालकांनी अभ्यासासाठी हीच मोकळीक दिली. त्यामुळे माझ्यावर दडपण आले नाही.
शिक्षकांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. आई वडिलांच्या सहकार्य शिवाय हे सगळं शक्य झाले नसते.
 |
| संकेत कोठावदेला पेढा भरवतांना आई वडील |
खूपच छान ....
ReplyDeleteGood interview questions
ReplyDelete