लोकसभा निवडणूक २०१९ नवमतदारांशी साधलेला संवाद शब्दांकन -2
लोकसभा निवडणूक २०१९ नवमतदारांशी साधलेला संवाद शब्दांकन -2
देशात निवडणुकीचे वारे वहायला लागले आहेत.राजकारणात विविध नाटकिय घडामोडी बघायला मिळतायत.नेतेमंडळी विविध आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती करतांना दिसतायत विविध राजकीय पक्ष आपल्या दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उत्तरावतायत.आजही लोकशाहीत घराणे शाही देशातील राजकारणात सक्रिय असल्याचे आपल्याला दिसते मावळ मतदारसंघात पार्थ पवार असतील असे अनेक उमेदवारांची उदाहरणे आपल्या समोर आहेत.आपल्या लोकप्रतिनिधी ची निवड करतांना त्याची नेतृत्व करण्याची क्षमता आहे की नाही हे तपासून निवड करावी केवळ पक्षा कडे पाहून डोळे झाकून मतदान करू नये.उमेदवाराची शैक्षणिक पात्रता सामाजिक पात्रता तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तर नाही ना ? याकडे गंभीरपणे लक्ष देणं आवश्यक आहे.आज सोशल मीडिया चा वापर वाढलेला आहे अश्या वेळी माहितीची देवाणघेवाण करतांना चुकीची खोटी माहिती व्हिडीओ सत्यता ना पडताळता व्हायरल करतो चुकीची माहिती फॉरवर्ड केल्याने सामाजिक बांधिलकी ला तडा जाऊन धार्मिक विद्वेष पसरविला जातो अशा खोट्या प्रवृत्तीच्या उमेदवारांना योग्य धडा शिकवायला हवा.एखाद्या उमेदवारच्या पाच वर्षा च्या काळात केलेल्या कामाचा अहवाल आपण तपासायला हवा. उमेदवार केवळ मतमागायला येतात आणि पुढे पाच वर्ष मतदार संघात फिरकत देखील नाही. केवळ आश्वासने असतील आणि कृती शून्य असणाऱ्या उमेद्वाराना घरी बसवायला हवे.आज शेतकरी आत्महत्या करताय बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे.एक अनेक प्रश्न आज देशात आहेत.आणि दुसरी कडे कार्य कर्ते राब राब राबतात पण त्यांना ही सत्तेसाठी केवळ राबऊन घेतलं जात कार्यकर्त्यांनी नेता व्हावं अस सहसा घडत नाही इतर पक्षातून आलेल्याना संधी मिळते पण कार्यकर्त्याना संधी मिळत नाही हे कुठे तरीबदलायला हवे.उमेदवाराची निवड करतांना जाती धर्माचा विचार न करता काम करणाऱ्या प्रामाणिक उमेदवाराची निवड होणे गरजेचे आहे.आर्थिक आमिष दाखवून मत विकत घेतलं जात लोकशाहीत एका मता ला देखील।किंमत आहे.पैसे घेऊन मतदान करणे हे लोकशाहीला घातक आहे.आज माझ्या सारख्या इतर नवमतदाराने या सगळ्या बाबींचा विचार केल्यास आमच्या देशात लोकशाही बरोबरच आमचे भविष्य उज्वल आहे हे निश्चित.
( शब्दांकन - वसंत कुलकर्णी )
रोहित महेश पवार
- विद्यार्थी
एस.वाय.बीकॉम .मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे
Comments
Post a Comment